Search This Blog

Tuesday, 24 May 2016



कंगव्याची गोष्ट
#####################
मागच्या शुक्रवारी सांगोल्याच्या स्टँडवर मित्राची वाट पाहत होतो.अलफाज सोबत होता. बुकस्टॉलवरून मी मटा घेतला. स्टॉलच्या शेजारीच चॉकलेट, बिस्कीट इ. चा स्टॉल आहे. मी अलफाजला तुला काही हवंय का असं विचारलं. त्याने थोडावेळ पाहून हात केला. मी पाहून हसू लागलो, बहाद्दराला काय हवं होतं माहितीय?
'
कंगवा' तोही त्याच्या शर्टला मँच करणारा.
मी जाम हसू लागलो. दुकानदार व शेजाारी उभे सर्वचजण हसत होते. अलफाज थोडं लाजला अन छोटा कंगवा खिशात ठेवून दिला.
खाण्याची वस्तू न मागता कंगवा मागणारा अलफाज पाहून ते सगळे हसत होते. मित्र म्हणाला, "बाप नेहमी असाच विचाार करतं जगावेगळा ,मग पोरगं कसं चुकेल?"
यावर मी फक्त हसलो.
अशी तुलना कधीच होऊनये. कारण यातून मुलांची व्यक्तीमत्वं फुलत नाहीत, उलट सावलीत खुरटून जातात. कधीच अशी तुलना करू नका. अलफाजचं माझं नातं मैत्रीचं आहे. आम्ही वाद घालतो, चर्चा करतो, एकमेकांच्या उणीवा दाखवतो, जाम वैतागतोही एकमेकांवर.. मी निश्चितच त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करायला शिकलोय.

#####

प्रत्येक मूल स्व प्रतिमा जपत असतं अन एक तुमच्या जडणघडणीचं महत्त्वाचं वैशिष्ट असतं. अलफाज कंगवा घेतो म्हणजेच स्वत:चे केस नीटनीटके रहावेत व ते चांगले दिसावेत ही भावना. कदाचित माझ्याकडे किंवा त्याच्या दहावीतल्या चाचूंकडे पाहिलेल्या कंगव्यामुळे त्याला तो घ्यावासा वाटला असेल. पण, यातून एकच गोष्ट समोर येते ती ही की "मूल स्वत:ची प्रतिमा जपत असतं" मग ते दिसायला कसं का असेना.
आपण मुलांना सतत येताजाता काळ्या, नकट्या, बुटक्या अशा उपाध्या लावत हिंडत असतो. एकप्रकारे उमलू पाहणारं रोपटं सपासप वार करून आपण ते छाटत असतो.
हे साधे प्रसंग आहेत पण हे मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करतात. ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं कुणी म्हटलेलं खपतं का? नाही ना!! मग मुलांचा विचार कधी करणार?

2 comments:

  1. मंदार मज्जा असते त्याची अशीच. मी जाम enjoy करत असतो.

    ReplyDelete